Dehu News : अभंग प्रतिष्ठानतर्फे 200 विद्यार्थ्यांना वह्या वाटप

 

Dehu News : अभंग प्रतिष्ठानतर्फे 200 विद्यार्थ्यांना वह्या वाटप
Pckhabar-अभंग प्रतिष्ठाण, श्रीक्षेत्र देहू यांच्या माध्यमातून संत तुकाराम विद्यालय देहू व संत जिजाबाई कन्या विद्यालय देहू येथील पाचवी ते दहावी या इयत्तेतील दोनशे विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.

याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक मोरे सर, युनियन बँकेचे मॅनेजर पांचाळ साहेब, विद्यालयातील शिक्षिका श्रीमती कुंभार मॅडम, घोरूडे मॅडम, कदम मॅडम, शिक्षक पवार सर, भंडारे सर,
घनवट सर, फुलसुंदर सर, उद्योजक श्री गणेश दरेकर, अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष, प्रवीण काळोखे उपाध्यक्ष, सुरेश गाडे, सचिव, सलीम मुलाणी व अभंग प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी अभंग प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष सागर मोरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 51 विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊन वह्या देण्यासाठी विशेष सहाय्य केले.

“विद्यार्थ्यांना अभंग प्रतिष्ठानच्या या विशेष सहकार्यातून गरजू विद्यार्थ्यांना निश्‍चितपणे आपले उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी प्रेरणा मिळते आहे”, असे प्रतिपादन पर्यवेक्षक मोरे सर यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, देहूचे माजी उपसरपंच सचिन कुंभार यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा. विकास कंद व आभार प्रदर्शन नारायण (तात्या) पचपिंड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *