Pimpri News : जून्या गाण्याची जादू कायम- राधा मंगेशकर 

Pimpri News : जून्या गाण्याची जादू कायम- राधा मंगेशकर
Pckhabar- सोशल मिडियाच्या दुनियेत आजही तरुणांमध्ये जुन्या गाण्याची जादू कायम आहे, असे प्रतिपादन गायिका राधा मंगेशकर यांनी केले.

 फॉर्च्यून  वास्तुशिल्प समूह  आणि पृथ्वीराज थिएटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय  व्हर्चुअल गायन स्पर्धा-  2021 घेण्यात आली. यावेळी पिंपळे सौदागर येथे या स्पर्धेचा निकाल जाहीर केला यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी पृथ्वीराज थिएटर्सच्या संचालिका  दया इंगळे, फॉर्च्युन वास्तूशिल्प समूहाचे संचालक नितीन धिमधिमे, मकरंद पांडे, मनीषा निश्चल, गायक गफार मोमीन आदी उपस्थित होते.

 उत्तराखंडच्या अलमोडामधील पवन तिवारी यांनी प्रथम बक्षीस पटकावले.   या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ फेसबुक लाइव्ह    माध्यमातून  संपन्न झाला.सदर स्पर्धा इंटरनेट माध्यमातून घेण्यात आली, स्पर्धेला जगभरातुन चांगला प्रतिसाद लाभला.

5 वर्षांच्या चिमुरड्यांपासून 70 वर्षांच्या पणजोबांपर्यन्त  सर्व वयोगटातील  सुमारे १७० गायक व हौशी कलाकार सहभागी झाले होते.

० ते १८ या वयोगटात  तश्मिन कौर (लुधियाना- पंजाब) यांनी प्रथम, राधिका दीपक मुंद्रा, पूना टोली (गोंदिया) या मुलीने द्वितीय तसेच आयुषी देवस्थळी( ठाणे) यांनी तृतीय  क्रमांक मिळवला. धार्मिक शहा (पुणे) हिमानी मेहता( गुजरात) यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आले.
१८ ते ५० या वयोगटात पवनकुमार तिवारी ( उत्तराखंड),  सुवर्णा भोंडे ( निगडी पुणे),  शिबानी घोष (प बंगाल) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला तर अभिनव रंगनाथन (पुणे), सुनील धोबी ( राजस्थान) यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आले.
वय वर्ष ५० पुढील गटात  योगेश गंधर्व(मुंबई) मानसी रॉय (हावडा प बंगाल), माणिक डे ( डोंबिवली ठाणे) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले.तर सुभाष पाटोळे (अहमदनगर), संजय मरळ (पुणे) यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

तर लोकगीत या गटात राजस्थानच्या हमीद खान यांना विशेष बक्षीस   जाहीर केले. विजेत्यांना १० हजार, ५ ह, ३ ह . असे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी तर उत्तेजनार्थ विजेत्यांना  स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र कुरीयर द्वारे पाठवले जाणार असल्याची माहिती नितीन धिमधिमे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *