Article By Vitthal Dalvi : पृथ्वीतलावर मोठे संकट येईल, तेव्हा भारतीय संस्कृतीचाच आधार घ्यावा लागेल !
Pckhabar-जेव्हा जेव्हा पृथ्वीवर फार मोठे संकट येईल,
तेव्हा तेव्हा भारतीय प्राचीन संस्कृतीचाच आधार घ्यावा लागेल
स्वामी विवेकानंद…
संपूर्ण जगामध्ये भारतीय पुरातन संस्कृती ही सर्वश्रेष्ठ मानली जाते, अशा प्राचीन संस्कृती असणा-या पवित्र देशामध्ये संपूर्ण जगाला मराठी भाषा व पवित्र प्राचीन संस्कृती विषयीचे महत्व पटवून देऊन भारतीय संस्कृतीची देणगी लाभलेल्या भारत देशाशिवाय मानव पृथ्वीवर फार काळ सुखानं जगू शकत नाही. असे प्रखर विचार मांडणारे स्वामी विवेकानंद यांनी अवघ्या २६ व्वा वर्षी अमेरिकेतील शिकागो येथे धर्मपरिषदेमध्ये प्रथमच हिंदू धर्माचे प्रतिनिधीत्व करुन मराठी भाषेचे महत्व, प्राचीन भारतीय संस्कृतीचे महत्व व वेदांचा प्रसार करुन भारत देशाला गौरवाचे स्थान प्राप्त करुन दिले.
भारत देशातील सामाजिक क्षेत्राची, शैक्षणिक क्षैत्राची व आध्यात्मिक क्षेत्राची झालेली दयनीय अवस्था पाहून स्वामी विवेकानंदांचे ह्दय कळवळले. ज्यांनी जीवनभर याच मातृभूमीच्या रक्षणासाठी संपूर्ण मानव जातीच्या उन्नतीसाठी “आत्मनो मोक्षार्थ जग द्वितायचं” या ब्रीद वाक्यातून संपूर्ण जगाच्या व मानवजातीच्या कल्याणासाठी आपले ध्येय जगासमोर ठेऊन “मनुष्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय” असे बहुमूल्य विचार मांडत समाजापुढे मराठी भाषेचा व प्राचीन संस्कृतीचा झेंडा अटकेपार लावत संपूर्ण जगाला विचारांतून संदेश देऊन माणसाने माणसाशी कसं वागलं पाहिजे, मानवानं संपूर्ण पृथ्वीतलावरील सर्व जीवांसाठी काहीतरी केले पाहिजे. ”जीवो जीवस्य जीवनमं”. सर्व जीव एकमेकांसाठी पूरक आहेत. वसुधैव कुटुंबकम संपूर्ण जगातील मानव तसेच प्राणीमात्र मिळून एक कुटुंब आहे. सर्वांचे रक्षण व पोषण केले पाहिजे. अशा आपल्या संस्कारांचे व संस्कृतीचे दर्शन घडविले, पृथ्वीतलावर जेव्हा जेव्हा असे फार मोठे संकट येईल, तेव्हा तेव्हा भारतीय प्राचीन संस्कृतीचाच आधार घ्यावा लागेल तेव्हाच पृथ्वीतलावर मानव सुखानं जगेल..
जो मानव पवित्र प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करेल
तो मानव थोर संतांचे ग्रंथ वाचेल
तोच मानव पृथ्वीतलावर तरेल……
अशा ब-याच गोष्टींचा विचार करता सध्या संपूर्ण जगावर आलेले कोरोनारुपी संकट सध्याच्या मानव संतांचे ग्रंथ, प्राचीन संस्कृती यांपासून दूर गेलेला मानव, हाताबाहेर गेलेली परिस्थिती, अदृश्य कोरोनारुपी शिरकाव, मराठी भाषेची झालेली हेळसांड, इंग्रजी भाषेची घट्टपकड, जंगलामध्ये वन्यजीवांना न मिळणारी जागा पृथ्वीवर असा ब-याच गोष्टींचा –हास होताना दिसत आहे. सध्याचा मानव हा परकिय संस्कृतीच्या आहारी गेलेला असून आता यामधून सावरणे कठीण आहे. यासाठी पृथ्वीतलावर मानवजातीच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी प्रत्येकान आज पुढे येण्याची गरज आहे. प्रत्येकानं दोन्ही हात पुढे करुन समाजहितासाठी मानव जातीचे रक्षण केले पाहिजे. यातून प्रत्येकानं काहीतरी शिकलं पाहिजे. संपूर्ण देश सावरण्याची गरज आहे. प्रत्येकानं सर्वोतोपरी प्रयत्न केले पाहिजे.
भारतीय संस्कृती टिकावी, जंगलामध्ये वन्यजीवांना संरक्षित जागा मिळावी यासाठी संपूर्ण जनजागृती झाली पाहिजे. विचारांमध्ये सर्वसमावेशक वृत्ती येण्यासाठी प्रत्येकाने संतांच्यां ग्रंथांची, विचारांची प्राचीन संस्कृतीची कास धरावी.यासाठी प्रत्येकास सद्बुद्धी मिळावी यासाठी याच पृथ्वीवर पुन्हा थोर संत व स्वामी विवेकानंदांसारखी सेवाभावी वृत्ती जोपासणारी महापुरुषे जन्मास यावी आणि ईश्वराची सेवा घडावी हीच सदिच्छा!
कविवर्य विठ्ठल रामू दळवी पंचक्रोशी हायस्कूल, दारुंब्रे
गाव कोथुरणे, सोमाटणे,
ता मावळ, जि, पुणे.










Leave a Reply