Pune News : MPSC हे मायाजाल;
एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्याने तरुणाची आत्महत्या
Pckhabar-MPSC हे मायाजाल आहे असे म्हणत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका तरुणाने आर्थिक परिस्थितीला कंटाळून पुण्यात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
स्वप्नीलच्या आत्महत्येमुळे MPSC च्या रखडलेल्या परीक्षांचा प्रश्न किती तीव्र बनलाय हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
स्वप्नील लोणकर (वय- 24, रा. फुरसुंगी, गंगानगर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने सुसाईड नोट लिहिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्याने आत्महत्या करत आहे. स्वप्नीलने 2019 आणि 2020 मधे झालेली एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होत यश मिळवले होते. पण पुढे या परीक्षांचाच भाग असलेली तोंडी परीक्षा दीड वर्ष झालीच नाही. 2021 मध्ये झालेली एम पी एस सी ची प्राथमिक परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता.
स्वप्नील लोणकर हा मुळचा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असून तो कुटुंबांसह पुण्यात राहत होता. स्वप्नीलचे वडील पुण्यातील शनिवार पेठेत बिल बुक छापण्याचा व्यवसाय करतात तर स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर स्वप्नील एम पी एस सी परीक्षेची तयारी करत होता.










Leave a Reply