Pimpri Corona News : कोरोना रुग्ण संख्या वाढतेय, नागरिकांनो गाफील राहू नका

Pimpri Corona News : कोरोना रुग्ण संख्या वाढतेय, नागरिकांनो गाफील राहू नका

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात दोनशेच्या आसपास असणारी कोरोना रूग्ण संख्या शनिवारी चारशेच्या जवळ गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता काळजी घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. शहरात 392 नवे रूग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 415 जणांना घरी सोडले आहे.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 78 हजार  734 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 53 हजार 147 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरात महापालिका हद्दीत 2 तर हद्दीबाहेरील 1 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका रूग्णालयात 991 रूग्ण उपचार घेत असून 304 रूग्ण गृह विलगीकरणात आहेत. 1 हजार 295 सक्रीय रूग्ण आहेत.

6 हजार 97 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 744 घरांना भेटी देऊन 2 हजार 250 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 47 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 445 करण्यात आले आहेत. शहरात 6 लाख 83 हजार 527 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *