Sad News : आगंबाई सुनबाई मालिकेचे कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या

Sad News : आगंबाई सुनबाई मालिकेचे कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या
Pckhabar- मराठी सिनेमा क्षेत्रातील दिग्दर्शक राजू सापते यांनी पिंपरी चिंचवडमधील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राकेश मौर्याया हा इसम आपल्याला विनाकारण त्रास देत असून, काम करु देत नाही. म्हणून या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे सापते यांनी मूत्यूपुर्वी केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे. यानिमित्ताने चित्रपटसृष्टीतील युनियनच्या दादागिरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
राजू सापते हे ताथवडे येथील लूक्स या सोसायटीमध्ये वास्तव्यास होते.
आत्महत्या करण्यापूर्वी राजू सापते यांनी व्हिडीओद्वारे आपली कैफियत मांडताना ते म्हणाले ‘मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. राकेश मोेर्या मला खूप त्रास देत आहेत. माझे कोणत्याही प्रकारचे पेमेंट थकीत नाही. राकेश मोरीया लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून वदवून घेत आहेत की राजू सापतेनी ‘एक का देड दिया नही’. मी सगळं पेमेंट क्लिअर केलं आहे. तरीही राकेश मोरीया मला खूप त्रास देत आहे. कोणतेही काम सुरू करु देत नाहीत, सध्या माझ्याकडे पाच प्रोजेक्ट आहेत. मला ‘झी’च काम सोडून द्यावं लागलं, तसेच दक्षमी क्रिएशन्सचे काम सुरू असताना त्यांनी ते बंद पाडले. त्यामुळे या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत आहे. तरी मला न्याय मिळावा.’ असे राजू सापते यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. सध्या सुरू असलेल्या आगंबाई सुनबाई या मालिकेसह  त्यांनी विविध चित्रपट आणि मालिकांमध्ये दिग्दर्शन केले आहे.
याबाबत वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर म्हणाले, याप्रकरणी शनिवारी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. राजू सापते यांच्या पत्नी तक्रार देण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर व्हिडीओमध्ये उल्लेख केलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *