Pimpri News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची मौखिक आरोग्य तपासणी करून घ्यावी: दंतरोग तज्ञ अमित नेमाणे
Pckhabar-कोरोनाची तिसरी लाट येणार असेल तर लहान मुलांची मौखिक आरोग्य तपासणी करून घेण्यात पालकांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन दंतरोग तज्ञ अमित नेमाणे यांनी केलेडॉ आहे.
कोरोना ची दुसरी लाट संपते न संपते तोच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरू झाली आहे , त्यातच तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याबद्दलचे अनेक सर्वे देखील प्रसिद्ध झाले आहेत , अशातच पालकांनी आपापल्या मुलांची काय काळजी घ्यावी याचा ” होमवर्क ” करायला सुरुवात केली आहे.
यासंदर्भात पिंपरी-चिंचवड खबर शी बोलताना शहरातील दंतरोग तज्ञ डॉ नेमाणे यांनी पालकांना मुलांच्या मौखिक आरोग्य बद्दल जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे.
कोरोनांच्या लक्षणांमध्ये घसा दुखणे हे लक्षण प्रामुख्याने अनेक रुग्णांमध्ये दिसते , अशा परिस्थिती मध्ये तीन ते चार वर्षांच्या आतील मुलांना नेमकी लक्षणे सांगणे अवघड जाते . सातत्याने तोंडाच्या दिशेने बोट दाखवून मुले वेदनादायी तक्रार करतात , त्यातच दात दुखी सारखा आजार असल्यास संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वाढते आणि मुलांच्या कोरोना संदर्भातल्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत जाते . अशातच पालकांचे आपल्या पाल्यांच्या मोखिक आणि एकंदर आरोग्याबद्दल जागरूकता असेल , तर डॉक्टरांना कोरोना सारख्या आजार व सहव्याधी मुळ होणारी गुंतागुंतीचे निदान करणे सोपे जाते.
कोरोना ची तिसरी लाट जर संभाव्य येणार असेल , तर त्यात केवळ डॉक्टर्स नव्हे तर पालकांना देखील महत्त्वाचा वाटा उचलणे गरजेचे आहे , जेणेकरून मुलांच्या आरोग्याची अधिकाधिक काळजी आपणाला घेता येईल , असेही मत दंतरोग तज्ञ डॉ नेमाणे यांनी व्यक्त केले.










Leave a Reply