Pune News : … जेव्हा भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात जातात!
Pckhabar-पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवीन मध्यवर्ती कार्यालयाचे नुकतेच उदघाटन पार पडले. पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना आज (शुक्रवार) नूतन कार्यालयात भेट दिली.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी व चहापानासाठी निमंत्रित केले होते. यावेळी पुणे शहराचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, गणेश बिडकर, हेमंत रासने, श्रीनाथ भिमाले, योगेश टिळेकर, अजय खेडेकर, सुशील मेंगडे, दत्ता खाडे, दिपक नागपुरे, गणेश घोष, धनंजय जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले ” पुणे मनपासह राज्यात आणि देशातही आम्ही एकमेकांचे राजकीय विरोधक असलो तरी महाराष्ट्राच्या विनयशील राजकीय संस्कृतीचे आम्ही वारसदार आहोत. हाच वारसा जोपासत भाजपच्या नेत्यांनी आमच्या निमंत्रणाचा मान राखला याबद्दल मी सर्वांचे आभार मानले”.










Leave a Reply