Alandi News : अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे जयघोषात प्रस्थान

Pckhabar- वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेली तुळशीमाळ…हातात भगव्या पताका…मुखात हरिनामाचा गजर करीत मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत माउलींच्या पादुकांचे शुक्रवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास प्रस्थान झाले!
सलग दुसर्या वर्षी कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे प्रस्थानला लाखो वारकरी भाविकांची गर्दी नसल्याने हरिनाम गजरात अगदी मोजक्या वारकरी, भाविकांचे उपस्थितीत झाले. प्रस्थान सोहळा थेट प्रक्षेपण असल्याने भाविकांनी आपापल्या घरात राहून सुरक्षित पणे पाहत आनंदवारी सोहळ्याचा आनंद घेतला.
माऊलींचे पादुका पालखी सोहळ्यास पुणे जिल्हा सत्र न्यायाधिश एन.पी.धोटे, खासदार बंडू जाधव, विधानपरिषद उपसभापती निलम गोर्हे, डॉ.राम गावडे, उर्जितसिंह शितोळे सरकार, प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, कृषिकेश आरफळकर, प्रांत विक्रांत चव्हाण, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अंकुश जाधव, मंडलधिकारी चेतन चासकर, पोलीस उपायुक्त प्रेरणा कट्टे, मंचक इप्पर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, श्रींचे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे, रामभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे, व्यवस्थापक माऊली वीर, श्रीधर सरनाईक, मानकरी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, रोहिदास तापकिर, गटनेते पांडुरंग वहिले, प्रशांत कुर्हाडे, आदित्य घुंडरे, मानकरी बाळासाहेब कुर्हाडे, योगेश आरु आदी निमंत्रित उपस्थित होते. पुजारी अमोल गांधी, महेश जोशी, राजाभाऊ थेटे, योगेश चौधरी, आदित्य जोशी, यज्ञेश जोशी, राजाभाऊ चौधरी आदींनी पौरोहित्य केले.
प्रस्थान सोहळ्याचे नियोजन यावर्षी थेट शासनाचे हस्तक्षेपात शासनाचे मान्यतेने मोजक्या लोकांत झाले. यावर्षीही सोहळ्यावर कोरोना या महामारीचे संकट असल्याने पुरेशी दक्षता व काळजी घेत महसूल व पोलीस प्रशासनाने नियोजन करून आळंदी देवस्थानसह सोहळ्यातील संबंधित घटकांना विश्वासात घेऊन करण्यात आले.
यास आळंदीकर नागरिक व भाविकांनी ही मोठा प्रतिसाद दिला.
अलंकापुरीत प्रस्थान सोहळ्या पूर्वी परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये मंदिरात पहाटे काकडा आरती, पवमान अभिषेक झाला. मंदिरात भाविकांना दर्शनास बंदी असल्याने यावर्षी माऊलींच्या संजीवन समाधी दर्शनास भाविक वंचित राहिले. दरम्यान नऊ वाजता वीणा मंडपात परंपरेने कीर्तन सेवा झाली. दुपारी परंपरेने मंदिरात माऊलींना महानैवेद्य झाला. यासाठी प्रथम सेवेकरी व स्वच्छता स्वयंसेवक यांनी माऊलींचा गाभारा स्वच्छ केला.











Leave a Reply