Dehu News : देहू नगरपंचायत कार्यालयात पूर्ण वेळ मुख्याधिकारी नेमा; देहू भाजपची मागणी
मधुसूदन बर्गे यांची तहसीलदार आणि प्रशासक या दोन्ही पदांचा कारभार सांभाळताना होतेय कसरत
Pckhabar-देहूगावमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत.
या समस्या सोडविण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही. शासनाने फक्त नगरपंचायत स्थापन केली. मात्र, येथील मुलभूत प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. नगरपंचायतचा कारभार मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे हंगामी प्रशासक म्हणून सोपविला आहे. त्यांना दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे
देहू नगरपंचायत कार्यालयात पूर्ण वेळ मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी देहू शहर भाजपचे शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीधर भाऊ नारायण टिळेकर, सचिन परशुराम काळोखे उपाध्यक्ष भाजप देहू, रविंद्र रामदास काळोखे, शहराध्यक्ष किसान आघाडी, गोरख सुखदेव टिळेकर आदी उपस्थित होते.
याबाबत दिलेल्या निवेदनात परंडवाल यांनी म्हटले आहे की, देहू ग्रामपंचायतची मुदत ८ ऑगस्ट रोजी संपुष्ठात आली. त्यानंतर ग्रामपंचायत चा कारभार सांभाळण्याची जबाबदारी दयानंद कोळी गटविकास अधिकारी यांच्या आली. परंतु त्यांच्याकडूनही मुलभूत सुविधा पुरविण्यात कुचराही झाली. दरम्यानच्या काळात कोरोना या वैश्विक महामारीने देहू नगरीत डोकं वर काढलं यानंतर ग्रामपंचायत कारभार महेश वाघमारे आरोग्य अधिकारी पंचायत समिती हवेली यांच्या कडे सोपविण्यात आला. परंतू यांच्या काळातही देहूकरांच्या नशीबी निराश पदरी आली.
काही दिवसांतच म्हणजेच ८ डिसेंबर रोजी ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला. नगरपंचायत कारभार मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची नगरपंचायत चे हंगामी प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या काळात निवडणूक होऊन कार्यकारी संचालक मंडळ स्थापन होणे अपेक्षित होते. परंतु कोरोना महामारीने पुन्हा एकदा डोके वर काढले व संचालक मंडळ (कार्यकारिणी सदस्य) अस्तित्वात आले नाही आणि देहूची परिस्थिती आहे. तशीच म्हणजेच बोलाचा भात आणि बोलाचीच कडी यासाठी विविध सेवा भावी संस्था राजकीय पक्ष यांनी निवेदनाद्वारे मागणी केली. परंतु याची कुठलीही दखल व कारवाई नगरपंचायत प्रशासनाने घेतली नाही. प्रशासक मधुसूदन बर्गे यांच्याकडे मावळ तालुक्याचे तहसीलदार हि मुख्य जबिबदारी आहे. तसेच देहू नगरपंचायत चा अतिरिक्त कारभार सांभाळणे शक्य होत नाही. त्यामुळे नगरपंचायत हद्दीतील प्रश्न काही कमी होताना दिसत नाहीत.










Leave a Reply