Pimpri News : खळबळजनक! जमिनीचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी 50 लाखांची लाच मागणार्या एकावर गुन्हा
Pckhabar-जमिनीच्या सुनावणीचा निकाल पिंपरी-चिंचवडच्या तहसिलदारांमार्फत त्यांच्या बाजूने लावण्यासाठी एका खासगी व्यक्तीने 50 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने निगडी पोलीस ठाण्यात एकावर आज (गुरूवार) गुन्हा दाखल केला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दिलीप दंडवते (रा. साई पार्क, दिघी) गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मित्राच्या सर्व्हे नंबर 444/1/1/1/1 या जमिनीच्या सात बारामधील नवीन नोंद झालेली नावे कमी करण्याबाबत आकुर्डीतील तहसिलदार यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. सुनावणीचा निकाल तक्रारदार यांच्या मित्राच्या बाजूने लावून देण्यासाठी आरोपीने 50 लाखांची लाच मागितली. याची गुरूवारी पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी दंडवते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शरद गोर्डे तपास करत आहेत.










Leave a Reply