Hinjawadi Crime News : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी युवक काँग्रेसचा पदाधिकारी, प्रसिद्ध उद्योजकावर गुन्हा दाखल

Hinjawadi Crime News : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी युवक काँग्रेसचा पदाधिकारी, प्रसिद्ध उद्योजकावर गुन्हा दाखल

Pckhabar-विवाहितेचा छळ करून तिला ठार मारण्याच्या उद्देशाने रिवॉल्वरने गोळी झाडली. तसेच तिचा छळ करण्यासाठी सासर्‍याने प्रोत्साहन दिले. याप्रकरणी औंध परिसरातील प्रसिद्ध उद्योजक आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार
महिलेचा पती गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (वय-36), नानासाहेब शंकरराव गायकवाड (वय-70, दोघे रा. औंध) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी गणेश उर्फ केदार याने काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्याची युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने पीडित विवाहितेला मारहाण केली. त्यानंतर रिवॉल्वरने गोळी झाडून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. विवाहितेवर अत्याचार करण्यासाठी सासर्‍याने पतीला प्रेरणा दिली. तसेच विवाहितेला काठीने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक बोरकर तपास करीत आहेत.

दरम्यान, विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी
आरोपींवर पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपींवर गेल्या काही दिवसात जमिनीच्या प्रकरणातून दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांचा तपास पोलीस करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *