Mumbai News : क्रिकेटर रोहित शर्माने लोणावळ्यातील बंगला विकला; इतक्या कोटींना झाला सौदा

Mumbai News : क्रिकेटर रोहित शर्माने लोणावळ्यातील बंगला विकला; इतक्या कोटींना झाला सौदा

Pckhabar-भारताचा धडाकेबाज फलंदाज  आणि वन डे क्रिकेट संघाचा उप कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने लोणावळ्यातील आपला बंगला विकला आहे.

रोहित हा सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे आणि तत्पूर्वी बीसीसीआयनं सर्व खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी दिली आहे. या सुट्टीत रोहित शर्मासह टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंडमध्ये भटकंती करताना दिसत आहेत.

zapkey.com ने याबाबतचे सर्व व्यवहार पत्रांची माहिती दिली आहे.

रोहितचा हा बंगला ६३२९ स्क्वेअर फूटाचा असून २९ मे २०२१मध्ये या प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन झाले आहे.  रोहित शर्माने २६ लाख रुपयांची स्टॅम्प ड्यूटी भरली आहे. लोणावळा हे नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या आवडतीचे हिल स्टेशन आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या हिल स्टेशनला अनेकांची पसंती आहे. त्यामुळे अनेकांनी येथे बंगले खरेदी केले आहेत. रोहितच्या प्रॉपर्टीची प्रती स्क्वेअर फूट किंमत ही ८३०० इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *