Article By Dr. Ankush Jadhav : कोरोनाचा बाऊ करण्याचे आता सोडून देणेच योग्य ठरेल!

Article By Dr. Ankush Jadhav : कोरोनाचा बाऊ करण्याचे आता सोडून देणेच योग्य ठरेल!

कोरोनाला नागरिक वैतागले;
दररोज मरे त्याला कोण रडे, नागरिकांमध्ये अशी होतेय भावना!

Pckhabar-डिसेंबर 19 मध्ये चीनच्या वूहान प्रांतात प्रथम करोना चा रुग्ण आढळून आला व गेले दीड  वर्षभर सर्व जग करोना च्या भितीखाली जगत आहे. कडक लॉकडाऊन सारखी स्थिती ही अनुभवली व आता अजून ही काही प्रमाणात शिथिल झालेल्या परंतु बंधने असलेल्या परिस्थितीत  जगत आहोत. पहिली लाट झाली, दुसरी सुरू आहे
तर तिसरी लाट येणार या
संभाव्य स्थितीतील भीतीत आपण जगत आहोत

आता वेळ आली आहे ती खरंच या निर्बंधाची गरज आहे का?जनतेत या विरुद्ध प्रचंड असंतोष खदखदत आहे. तो एखादं दिवशी उफाळून वर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पहिल्या लाटेचा वेळी लोकांत जी भीती, गैरसमज होते ते दुसऱ्या लाटेत अजिबात दिसत नाहीत. आता तर लोक करोना च्या बापाला भीत नाहीत व भिणार नाहीत. कारण “भित्या पाटी ब्रम्हराक्षस” वा” दररोज मरे त्याला कोण रडे” अशी लोकांची स्थिती झाली आहे. ते सर्वच बाजूनी याला कंटाळले आहेत.

भारतात दररोज सर्व प्रकारच्या कारणांनी 26 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होतो. कोरोना ने सरासरी दररोज 700 ते 800 मृत्यू झाले आहेत. यातील  60 वर्षावरील लोकांचे जे मृत्यू झालेत ते 70 ते 73 टक्के हे सहव्याधी (कोमोरबीडीटी) मुळे झाले आहेत. गेले वर्षभर रुग्णालयात जे मृत्यू झाले त्यांची नोंद ही सामान्यतः करोनामुळे झालेत हे दाखविले गेले आहेत.

तरुणांचे जे मृत्यू झालेत त्यालाही सहव्याधी हेच कारणीभूत आहेत.
भारत सरकारच्या जन्म-मृत्यू निबंधकांनी काही वर्षांपूर्वी सादर केलेल्या वृद्धावस्थेतील व सर्व वयात होणाऱ्या मृत्यूंच्या कारणांच्या अहवालानुसार विविध संस्थांमध्ये होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी पुढीलप्रमाणे–
वृद्धावस्थेतील पुरुष व स्त्री-
पचन संस्था पु-5.8, स्त्री-6.4,
श्वसन संस्था पु-32.2, स्त्री-29.4
मज्जा संस्था पु-10.8, स्त्री-19.9
रक्ताभिसरण पु-21.8,ज्ञस्त्री-22.5
इतर रोग        पु-14.8,स्त्री-16.4
60 वर्षाखालील सर्व वयातील-
पचन संस्था पु-7.5, स्त्री-8.4
श्वसन संस्था पु-26.4,स्त्री-22.3
मज्जा संस्था पु-6.3, स्त्री-6.5
रक्ताभिसरण पु-14.7,स्त्री-13.4
इतर             पु-12.7,13.4
जगात मिनिटाला 17 मृत्यू  कर्करोगोमूळे होतात. मलेरिया मुळे दरवर्षी जगात 25 ते 26 लाख मरतात तर याच्यामुळे 10 कोटी लोकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. जगात दरवर्षी कर्करोग, हृदयविकार, मधुमेह, विविध श्वसन विकार इ (Non communicable diseases)मुळे साधारणतः 4 कोटी पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होतो.

     मध्यंतरी ठाण्यातील एक अवहाला नुसार प्रत्येक 9 वा माणूस हा करोना ने मृत्य पावला आहे. कोरोना चा मृत्यू दर हा साधारणतः 2 टक्के आहे. याचाच अर्थ 98 टक्के लोकांना काही धोका नाही. यातील 3 टक्के लोक साधारण, मध्यम व गंभीर होते ते वाचले.

     कोरोना मुळे खरंच खूप मारतात का?याचा शोध गुगल वर घेतला असता पुढीलप्रमाणे दिसून आले–
2017-7.24,2018-7.23
2019-7.27,2020-7.30.
याचाच अर्थ काही विशेष फरक नाही.
जागतिक आरोग्य संघटने मागेच जाहीर केले आहे की, येथून पुढे कोरोना बरोबरच जगायचे आहे. पूर्वीच सांगितल्या प्रमाणे कोरोना साध्या सर्दी सारखा आजार होईल हे आता अनेक तज्ञ ही म्हणू लागले आहेत.

कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना कोरोना  अपायकारक न ठरता  तो ठरतो फक्त सर्वसामान्य लोकांना. कारण या कोरोना काळात 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या, कुंभमेळा झाला, अन्य मोठे कार्यक्रम झाले. तेव्हा करोना कुठे गेला होता.? महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी गोकुळ ची निवडणूक झाली, पुणे शहरात  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उदघाटना साठी झालेली गर्दी, भा. ज.प.ने केलेले आरक्षण विरोधी चक्का जाम आंदोलन, कराड येथील कृष्णा सहकारी ची 29 तारखेला झालेली निवडुन इ.या अलीकडेच्या काळात झालेल्या गोष्टी पाहिल्या नंतर मनात विचार येतो तो, खरंच या वेळी कोरोना कुठे जातो?लपून बसतो का?

   या कोरोना काळात काही डॉक्टरांनी अतिशय प्राणपणाने काम केले तर काही डॉक्टरांनी ही संधी समजून लाभ ही घेतला. त्यामुळे समाजात काही प्रमाणात डॉक्टर लुटतात ही प्रतिमा तयार झाली. कोणतेही कोरोना बरा करणारे औषध नसताना बिल मात्र लाखोंच्या घरात आली व येत आहेत. या लॉकडाऊन वा निर्बंधांवर “राजकारणी, डॉक्टर व औषध कंपन्यांनी पैसे कमविण्यासाठी कोरोना शोधून काढला आहे”अशी प्रतिक्रिया ही समाजात उमठू लागली आहे.

       यात दोष आहे तो विविध राजकीय पार्ट्यांचा व त्यांच्यातील सामंजस्याच्या अभावाचा. केंद्र व राज्यातील विविध पार्ट्यांची सरकारे व तेथील विरोधी पक्ष. सत्ताधारी पार्टी कोरोना वर निर्णय घ्यायला घाबरते ती विरोधी पक्ष याचा फायदा घेईल म्हणून. खरं तर या कोरोना काळात सत्ताधारी व विरोधी पक्षांनी सामंजस्य दाखवून एकत्र येऊन काम केले असते तर ही आजची परिस्थिती आली नसती. जो तो ही संधी समजून याचा कसा फायदा याचाच विचार करीत आहे हे खरे दुर्दैव.
केवळ 4 पर्यंत काही दुकाने बंद करून कोरोना कमी होणार आहे का?उलट वेळ कमी केलेल्यामुळे गर्दी वाढते. रस्त्यावर गर्दी कमी होणार आहे का?वस्तुस्थिती ही आहें की ग्रामीण भागातील शहरांसाहित सर्वच शहरांत रस्त्यांवर खूप गर्दी आहे, सर्व प्रकारची वाहने आहेत. अशा स्थितीत  कोरोना वर काय फरक पडणार आहे.? फक्त घरात बसून कोरोना होणार नाही का? RT-PCR टेस्ट सर्वत्र जरी केल्या तरी जे आज निगेटिव्ह आलेत ते 4 दिवसांनी पोसिटीव्ह येणार नाहीत हे कशावरून? ही एक न संपणारी प्रक्रिया आहे.
लॉकडाऊन व अनलॉक मुळे ना कोरोनाची ना साखळी तुटते ना रुग्ण कमी होतात   हे बरेच वेळा दिसून आले आहे. अशा स्थितीत कोरोना बरीच वर्षे राहणार म्हणून लॉक डाऊन ही तितकी वर्षे सुरू ठेवणार का?हा काही उपाय नाही. लोकांचे जगण्याचे हाल होत आहेत. मानसिक स्थिती खराब होऊन मानसिक आजार वाढत आहेत.
भीती पेक्षा कोणताही मोठा वायरस नाही आणि हिंमतीपेक्षा मोठी कोणतीही लस नाही.
या सर्वाचा विचार करता आता निर्बध रद्द करून सर्व सुरू ठेवावे. स्थानिक डॉक्टरांना मग ते अलोपॅथी असो वा आयुर्वेदिक असोत. त्यांना रुग्ण ट्रीट करायची परवानगी द्यावी. (नाही तरी आता तेच रुग्ण ट्रीट करीत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. कोरोना ची लक्षणे दिसताच लोक स्वतः औषधे घेतात वा डॉक्टर कडे जातात.) मग बघा करोना पळून जातो ते.
कोरोनाचा बाऊ करण्याचे आता सोडून देणेच योग्य ठरेल. मिडियाने ही बातम्या देतात ना थोडा समाजाचा विचार करावा, थोडे तारतम्य बाळगून बातम्या द्याव्यात. एवढीच माफक अपेक्षा.

योग्य प्रकारे मास्क वापरा, दोघांमध्ये योग्य अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा,गर्दीत जाण्याचे शक्यतो टाळा, वारंवार हात स्वच्छ ठेवा. या सामान्य प्रतिबंध उपायांचा अवलंब करा व कोरोना ला संपवलला मदत करा. यातच स्वतः चे,घराचे, राज्याचे व देशाचे हित आहे हे विसरू नका.
डॉ. अंकुश जाधव

नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली).
#कओरोनाचा बाऊ नको#
#वस्तुस्थिती#
#विविध आजार”#
#मृत्यू#
#सावधानता#

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *