Pune News : पीएमपीएलचा अतिरिक्त कारभार खेमनार यांच्याकडे

Pune News : पीएमपीएलचा अतिरिक्त कारभार खेमनार यांच्याकडे
– डाॅ. राजेंद्र जगताप यांनी पदभार सोडला
Pckhabar- पीएमपीएल अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी बुधवारी पीएमपीएलचा पदभार सोडला. जगताप यांची प्रतिनियुक्तीची मुदत संपल्याने ते कार्यमुक्त झाले. पीएमपीएल अध्यक्षपदाचा अतिरिक्त पदभार महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्याकडे देण्यात आला आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) अध्यक्षपदावर कार्यरत असलेले डाॅ. जगताप हे केंद्रीय सेवेत आहेत. मात्र, मागील काही वर्षांपासून ते राज्य शासनाच्या सेवेत प्रतिनियुक्तीवर आले होते. त्यांनी पुणे महापालिका अतिरीक्त आयुक्त, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहीले. यानंतर मागील वर्षांपासून ते पीएमपीएल अध्यक्ष म्हणुन रुजू झाले होते.

दरम्यान, त्यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी बुधवारी पदभार सोडला. डॉ. जगताप यांच्याकडून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे, अशी माहीती पीएमपीएल प्रशासनाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *