Pimpri News :  ’पे अँड पार्किंगचा निर्णय ठेकेदार व सत्ताधाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी’ : एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांचा आरोप

Pimpri News :  ’पे अँड पार्किंगचा निर्णय ठेकेदार व सत्ताधाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी’ : एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांचा आरोप
Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिका विविध माध्यमातून नागरिकांकडून कर वसूल करते. 2 वर्ष कोरोना व लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे लोकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच महापालिकेकडून नागरिकांना वेठीस धरणारा पे अँड पार्किंगच्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून (गुरूवार) होणार आहे. मात्र, हा  केवळ ठेकेदार व सत्ताधारी यांचे खिसे भरण्यासाठी घेतला जात असल्याचा आरोप  एम आय एम पक्षाचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी केला आहे. तसेच हा निर्णय त्वरीत रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत  एम आय एम  पक्षाचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.  आयुक्तांना निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर हे इतर शहरांच्या तुलनेत अतिशय प्रशस्त शहर आहे. शहराची नियोजन रचना देखील अतिशय उत्तम प्रकारची आहे. शहरातील रस्ते देखील सुटसुटीत आहेत. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या 25 ते 27 लाखाच्या जवळपास आहे. शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असताना देखील शहरात अपवादात्मक ठिकाणे सोडली तर कुठेही ट्रॅफिकची समस्या उद्भवत नाही. किंवा प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही. पिंपरी चिंचवड शहर हे सुजाण व कायद्याचे पालन करणार्‍या नागरिकांचे शहर आहे. असे असताना देखील पालिकेच्या वतीने शहरात आवश्यकता नसताना पे अँड पार्क धोरण राबविले जात आहे. त्यामुळे पे अ‍ॅण्ड पार्किंगचे धोरण त्वरीत रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *