Bhosari Crime News : कामगाराचा मृत्यू, कंपनी मालकांवर गुन्हा

Bhosari Crime News : कामगाराचा मृत्यू, कंपनी मालकांवर गुन्हा
Pckhabar-कंपनीत काम करत असताना एअर बेलो जॉब लिकेज आहे का? हे पाहण्यासाठी एअर प्रेशरने टायरमध्ये हवा भरत असताना बोल्ट स्लीप झाल्याने एअर बेलो तोंडाला, गळ्याला लागल्याने जखमी होऊन कामगाराचा मृत्यू झाला. हा प्रकार भोसरीतील पुना इन्जीटेक प्रा. लि. या कंपनीत 5 जून रोजी घडला. याप्रकरणी कंपनीच्या दोन मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रम लोकबहादुर भुल असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील लोकबहादुर जयसिंग भुल (वय-50, रा. भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पुना इन्जीटेक प्रा. लि. मालक सोपान येवले, जयंत राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम हा पुना इन्जीटेक प्रा. लि. या कंपनीत एअर बेलो जॉब लिकेज आहे का? हे पाहण्यासाठी एअर प्रेशरने टायरमध्ये हवा भरत असताना बोल्ट स्लीप झाल्याने एअर बेलो तोंडाला, गळ्याला लागल्याने जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. विक्रमला या कामाचा कोणताही अनुभव नसताना त्याला ते काम करण्यास आरोपींनी सांगितले. तसेच सुरक्षेची कोणतीच उपाय योजना न केल्यामुळे विक्रमचा मृत्यू झाला. त्यामुळे कंपनी मालक येवले आणि राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फौजदार घिगे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *