Dehuroad Crime News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमधील दोघांनी ज्येष्ठ दाम्पत्याला दिवसाढवळ्या लुटले

Dehuroad Crime News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमधील दोघांनी ज्येष्ठ दाम्पत्याला दिवसाढवळ्या लुटले
Pckhabar-एका समारंभाला जाणार्‍या दाम्पत्याला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून मारहाण करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील दिड लाखांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. हा धक्कादायक प्रकार मुंबई-पुणे महामार्गावर सोमवारी सकाळी अकरा वाजता किवळे येथे घडला.

विशाल सुभ्राय अणवेकर (वय-60, रा. कसबा पेठ, पुणे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारमधील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला बावधन येथील मेरीगोल्ड बॅक्वेट हॉल येथे जायचे होते. त्यासाठी सोमवारी सकाळी ते चांदणी चौकात थांबले होते. त्यावेळी आलेल्या एका कार चालकाने फिर्यादी यांना लिफ्ट देण्याचा बहाणा करून गाडीत बसविले.

मुंबई-पुणे महामार्गावर किवळे येथे फिर्यादी यांना मारहाण करण्याची धमकी देऊन चालकासह त्याच्या जोडीदाराने त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील दोन सोन्याचे गंठण, एक अंगठी असा 1 लाख 53 हजार रूपयांचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. आणि त्यांना कारमधून खाली उतरविले. देहूरोड पोलीस तपास करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *