Pimpri News : घरकुलमधील नागरिकांची मतदार यादी फेरनोंदणी करा: अशोक मगर
Pckhabar- घरकुल, चिखली येथील सुमारे 7 हजार नागरिकांची भोसरी विधानसभा मतदार संघात अद्यापही नोंदणी झालेली नाही. केंद्र सरकारच्या येथे एकूण 5 हजार 500 लोकांना घरे मिळाली आहेत. हे सर्व नागरिक पूर्वी शहराच्या विविध प्रभागात वार्डात भाड्याने रहात होते. त्यापैकी सुमारे 7 हजार नागरिक येथील भोसरी विधान सभा आणि वार्ड क्र 11 च्या यादीत नावे नसल्यामुळे 2017 पासून ते मतदानापासून वंचित आहेत. जिल्हाधिकारी पुणे आणि निवडणूक अधिकारी यांनी विशेष मोहीम राबवून त्याची नावे भोसरी विधानसभा मतदार संघात स्थलांतरित करावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अशोक मगर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
येथील नागरिकांचे आधारकार्ड आणि रेशन कार्डवरील पत्ते बदललेले नसल्यामुळे मुलांच्या शाळाप्रवेशासाठी प्रमाण पत्रे मिळवताना आणि रेशनसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. आहेत. मतदान कार्डावरील पत्ता पूर्वीचा असल्यामुळे स्थानिक उमेदवाराला मतदान करता येत नाही.येथे 160 इमारती आहेत. त्यापैकी 137 इमारतीमध्ये 20 ते 23 हजार लोक राहतात. आज मितीस फक्त 7 हजार 500 नागरिकांची मतदान यादीत नोंद आहे. उर्वरित 10 हजाराहून जास्त मतदान स्थानिक उमेदवारास करता येत नाही. मतदानाचा हक्क बाजावणीसाठी त्यांना पूर्वीच्या ठिकाणी जावे लागते.
या मोठ्या वसाहतीत स्वतंत्र शासकीय नागरीसुविधा केंद्र आणि मतदान नोंदणी अधिकारी नेमावेत.
निवडणूक अधिकाऱ्यांनी या नागरिकांची मतदार यादीत स्थानिक मतदार म्हणून नोंदणी करावी. यासाठी पत्रव्यवहार झाला आहे असे समजते. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचेकडे अशोक मगर, संतोष माळी, विकासराजे केदारी यांनी एका निवेदनाद्वारे पाठपुरावा करून मागणी केली आहे.










Leave a Reply