Dehu News : राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल प्रमुख संघटकपदी शशिकांत गुरव
Pckhabar- श्रीक्षेत्र देहूतील सामाजिक कार्यकर्ते शशिकांत गुरव यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल प्रमुख संघटकपदी मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्ती पत्रक देण्यात आले.
यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल उपाध्यक्ष सचिन कुंभार, सोमनाथ धोंगडे , युवा नेते योगेश काळोखे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष सचिन काळोखे, अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण काळोखे, सागर मोरे, प्रा. विकास कंद , लक्ष्मण काळोखे, संकेत साळुंखे, रुपेश सोणुने, विशाल झेंडे, प्रणव काळोखे उपस्थित होते.










Leave a Reply