Talegaon Dabhade News :   नगरपरिषदेमध्ये पूर्णवेळ मुख्याधिकारी नेमा ; भाजपची मागणी

Talegaon Dabhade News :   नगरपरिषदेमध्ये पूर्णवेळ मुख्याधिकारी नेमा ; भाजपची मागणी
Pckhabar- तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने विकास कामे प्रलंबित आहेत. प्रशासन प्रमुख नसल्याने कोणताही महत्वाचा निर्णय अथवा विकास कामाबाबत निर्णय होत नाही. त्यामुळे नगर परिषदेमध्ये पूर्णवेळ  मुख्याधिकार्‍याची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना आज (सोमवार) भाजपचे माजी राज्यमंत्री संजय भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या
नेतृत्वात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, सभागृह नेते अरुण भेगडे, संतोष दाभाडे, नगरसेविका शोभा भेगडे, नीता काळोखे, कल्पना भोपळे, प्राची हेंद्रे आदी उपस्थित होते.

तत्कालीन मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची बदली झाल्याने मे महिन्यामध्ये शासनाने श्याम पोशेट्टी यांची मुख्याधिकारीपदी नियुक्ती केली होती. मात्र, अवघ्या 28 दिवसांमध्ये लाचखोरीच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. यामुळे नगरपरिषदेचा प्रभारी पदभार लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, लोणावळा आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे कामकाज पाहताना जाधव यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कोरोना कालावधीत पूर्ण वेळ काम पाहणार्‍या मुख्याधिकार्‍याची गरज आहे. त्यामुळे  परिषदेमध्ये पूर्णवेळ मुख्याधिकार्‍याची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *