Bhosari Crime News : पीएमपीएमएल बस चालकाची अतिघाई, प्रवाशाच्या जिवावर बेतली
Pckhabar-पीएमपीएमएल बसमधून खाली उतरत असताना चालकाने थांबा आला आहे, असे सांगून बस थांबवून प्रवाशांना खाली उतरण्यास घाई करून बसचा ब्रेक अचानक दाबल्याने प्रवाशाचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता मोशी येथे घडली.
भगवानदास बोडर यादव (वय-51, रा. आल्हाट वस्ती, मोशी) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा ओमप्रकाश भगवानदास यादव (वय-21) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीएमपीएमएल बस चालक गणेश मधुकर साबळे (रा. लोणीकंद) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे वडिल रविवारी सायंकाळी पीएमपीएमएल (एमएच-12, आर. एन. 5109) या बसने जात होते. मोशीतील जुना जकात नाका येेथे फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना उतरायचे होते. त्यावेळी आरोपीने बस थांबा आला आहे, खाली लवकर उतरा असे म्हणून बस थांबवली.
चालकाने प्रवाशांना उतरण्यास घाई केल्याने भगवानदास यादव हे उतरत असतानाच आरोपीने बस पुढे घेऊन अचानक ब्रेक दाबला. यामुळे भगवानदास यांचा तोल जावून ते खाली पडले. डोक्याच्या मागील बाजूला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. फौजदार पुजारी तपास करत आहेत.










Leave a Reply