Dehuroad Crime News : पोलिसाचीच दुचाकी चोरीला

Dehuroad Crime News : पोलिसाचीच दुचाकी चोरीला

Pckhabar- एका पोलिसाची दुचाकी लाॅक करून पार्क केलेली असताना अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार देहूरोड येथे उघडकीस आला आहे. ही दुचाकी देहूरोड येथील मदिना मस्जिद येथून चोरून नेली. चोरट्यांनी पोलिसाचीच दुचाकी चोरून नेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत पोलीस नाईक दादासाहेब जगन्नाथ जगताप यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगताप यांनी दि. 26 जून रोजी देहूरोड येथील मदिना मस्जिद येथे सीडी डिलक्स ( एम एच-12, सीएक्स 2683) लाॅक लावून पार्क केली होती. लाॅक तोडून 35 हजार रुपये किंमतीची त्यांची दुचाकी चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *