Dehuroad News : ओबीसीच्या आरक्षणासाठी मुंबई-पुणे महामार्गावर भाजपचे चक्काजाम आंदोलन

Dehuroad News : ओबीसीच्या आरक्षणासाठी मुंबई पुणे महामार्गावर भाजपचे चक्काजाम आंदोलन
Pckhabar-महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. ओबीसींवरचा हा अन्याय भारतीय जनता पक्ष कदापीही सहन करणार नाही. म्हणून आज राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. देहूरोड शहर येथे छत्रपती शिवशंभो चौकात भाजपच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आला.
यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य, देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डचे सदस्य रघुवीर शेलार आणि पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष बाळासाहेब काळोखे उपस्थितीत देहू शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, देहूरोड शहराध्यक्ष बाळा शेलार यांच्या नेतृत्वात देहू – देहूरोड शहर भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले.

सरकारने ओबीसींच्या या आक्रोशाची दखल घेऊन आतातरी ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा. या आंदोलनाला देहू भाजपचे शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब काळोखे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य लहू मामा शेलार, सरचिटणीस तुकाराम नाना जाधव कार्याध्यक्ष बाळासाहेब झेंडे, नगरसेवक राहुल भालघरे, नगरसेवक विशाल खंडेलवाल, नगरसेवक सारिका नाईकनवरे, उमाशंकर सिंह, मा. अध्यक्ष कैलास आण्णा पानसरे, उपाध्यक्ष सचिन काळोखे, ओबीसी आघाडी अध्यक्ष संदीप परंडवाल, उपसरपंच संतोष हगवणे, मा. युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश टिळेकर, मा. उपाध्यक्ष मावळ तालुका संभाजी टिळेकर, पुणे जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल टिळेकर, उमेश शिंदे, उमेश नाईक, सरचिटणीस सागर मुसूडगे, सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *