Pimpri News : कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांची अशीही वटपौर्णिमा..!
Pckhabar- आज (गुरूवार) सर्वत्र वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातोय, या दिवशी विशेष करून सुवासिनी महिला सुंदर श्रुंगार करतात. मात्र इच्छा असूनही महिला पोलीस कर्मचार्यांना याही सणाचा आंनद घेता येत नाही. त्याला पिंपरी – चिंचवड शहराच्या महिला पोलिस मात्र याला अपवाद ठरल्या आहेत. महिला पोलिसांनी वाल्हेकरवाडी येथील पोलीस चौकीच्या बाहेरील वडाच्या झाडांची पूजा आणि फेरे मारून वटपौर्णिमा साजरी केली.
वटपौर्णिमा महिलांचा सौभाग्याचं सण या दिवशी सुहासिनी महिला भरगच्च दागिने घालून घरा बाहेर पडतात. आणि याच संधीचा फायदा घेत अनेक ठिकाणी सोन साखळी हिसकावन्याचे प्रकार घडतात, अशा घटना घडू नये म्हणून पिंपरी – चिंचवड पोलिसांकडून ठिकठिकाणी पोलिस बंदोस्त तैनात केला जात आहे.
पोलिसांकडून तैनात केल्या गेलेल्या बंदोबस्ताच्या ठिकाणी महिला पोलिस कर्मचारीही असतात, आणि ज्या वेळी इतर महिलांची वडाच्या झाडाजवळ गर्दी कमी होते, तेव्हा महिला पोलीस कर्मचार्यांनी वडाची पूजा करत वट सावित्रीची परंपरा जपल्याच बघायला मिळाल. मात्र हा प्रकार अंधश्रद्धेला बढावा देण्यासाठी नाहितर वृक्षपूजेतून-वृक्षसंवर्धनाचं महत्व पटवून देण्यासाठी करत असल्याचं महिला पोलिसांनी संगितले. कर्तव्य दुसरीकडे परंपरा तसेच भावनांचा कल्लोळ, नेहमीच अशा परिस्थितीत कर्तव्याला प्राधान्य देणार्या महिला पोलीस कर्मचार्यांच्या कर्तुत्वाला सलामच केला पाहिजे.










Leave a Reply