Pimpri News : अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

Pimpri News : अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
Pckhabar- अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोन महिलांसह एका पुरूषावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे बांधकाम मौजे सुस येथे केले आहे.

नामदेव नंदू बांधल याच्यासह आणखी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवेक प्रभाकर डुब्बेवार (वय-36, रा. नांदेड सिटी, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुळशीतील मौजे सुस येथे अनाधिकृत बांधकाम केले. याबाबत त्यांना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे
कनिष्ठ अभियंता अर्जुन पाटील यांनी आरोपींना अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस  दिली. तसेच बांधकामाची परवानगीची प्रत सादर करण्यास सांगितले. परवानगी नसल्यास 24 तासाच्या मुदतीत अनधिकृत बांधकाम स्वखर्चाने पाडण्याचे आदेश दिले. मात्र, या नोटीसीला आरोपींनी उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *