Dehu News : कोरोनाच्या संकटकाळात रोटरी क्लब ऑफ देहू, अभंग प्रतिष्ठानचा गरजूंना मदतीचा हात

250 कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप
Pckhabar- रोटरी क्लब ऑफ देहू व अभंग प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या संकट काळात 250 गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
विश्ववकल्याण मानव सेवा संस्था देहू, वृद्धाश्रम, देहू, नगरपंचायत येथील सेवाभावी कर्मचारी वर्ग यांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. या किराणा साहित्यासाठी एस. जी. अॅनालीटीक्स कंपनीच्या माध्यमातून सी.एस.आर फंड, रोटरी क्लब ऑफ बिबेवाडी व अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण काळोखे यांनी 100 किटसाठी विशेष सहकार्य केले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून 250 किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी निगडी रोटरी क्लबचे रो.प्रवीण घाणेगावकर, रो. विजय काळभोर, रो. मुकुंद मुळे, नुयोग जगवानी, देहू देवस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजीराव मोरे ,वि.वि.कार्य. सोसायटीचे चेअरमन अभिमन्यू काळोखे, रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.अजित चव्हाण, अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण काळोखे व दोन्ही संस्थांचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.प्राध्यापक संदीप भोसले यांनी केले. प्रास्ताविक रो .गणेश सावंत यांनी केले तर आभार सचिन कुंभार यांनी मानले.










Leave a Reply