Dehu News : कै. अमित शिवळे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

Pckhabar- कर्तव्य फाऊंडेशनचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते अमित बाळासाहेब शिवळे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ प्राथमिक आरोग्य केंद्र देहू या ठिकाणी आयुर्वेदिक वृक्षबाग साकारण्यात येत आहे. यासाठी आरोग्य केंद्राच्या मागणीनुसार कर्तव्य फाउंडेशन देहू यांच्या वतीने आणि आरोग्यक्रांती प्रतिष्ठानच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले.
अमित शिवळे यांचे मृत्यूसमयी वय ४१ असल्याने एकूण ४१ झाडे लावण्याची संकल्पना पुढे आली. यामुळे एकूण ४१ आयुर्वेदिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती कर्तव्य फाऊंडेशच्या सदस्यांकडून देण्यात आली.
देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. किशोर यादव यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. यावेळी कर्तव्य फाऊंडेशचे सदस्य यावेळी उपस्थित होते.










Leave a Reply