Dehu News : संत जिजाबाई कन्या विद्यालयात योग दिन साजरा

 

Dehu News : संत जिजाबाई कन्या विद्यालयात योग दिन साजरा

Pckhabar-संत जिजाबाई कन्या विद्यालयात 21 जून 2021 आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वडाळकर मॅडम तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिविंगच्या योग शिक्षिका दिपाली पवार तसेच राहुल पिसे यांनी योगाचे, प्राणायामाचे महत्त्व विशद केले. कोरोनाच्या या संकटात योगाचे महत्त्व सर्वांना समजले आहे. प्रत्येकाने दररोज सकाळी योगा करून दिवसाची सुरुवात करावे, असे मार्गदर्शन केले.

तसेच झूम मीटिंग द्वारे इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थिनींचे सकाळी 8 ते 9 या वेळेत योगा प्रात्यक्षिकेही घेण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे क्रीडाशिक्षक दळवी एस. सी. यांनी केले. विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका राऊत बी. एस. यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *