Pimpri Corona News : शहरात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या हजारांच्या आत

Pimpri Corona News : शहरात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या हजारांच्या आत

अडीच लाख रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. रूग्ण संख्या दोनशेच्या आत तर मृत्यूचा आकडही कमी झाला आहे. त्यामुळे शहरवासियांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. तर मंगळवारी 194 नवे रूग्ण आढळून आले असून एकाच दिवशी 485 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 9 जणांचा मृत्यू झाला आहे.  तर सक्रिय रुग्ण 994 आहेत.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 55 हजार 733 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 50 हजार 477 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरात महापालिका हद्दीत 4 तर हद्दीबाहेरील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका रूग्णालयात 721 रूग्ण उपचार घेत असून 273 रूग्ण गृह विलगीकरणात आहेत. 994 सक्रीय रूग्ण आहेत.
3 हजार 23 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 653 घरांना भेटी देऊन 2 हजार 284 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 34 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 416 करण्यात आले आहेत.

शहरात 5 लाख 71 हजार 217 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *