Dehu News : धोकादायक लाईट डीपी, दोन पोल हटविले; जन जागृती मंचाच्या मागणीला यश
Pckhabar- देहुगावातील मुख्य कमानी समोरील वाहतुकीस अडथळा ठरणारे व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण केलेले चौकातील लाईट डीपी व दोन मोठे पोल हटविण्याची मागणी महावितरणकडे करण्यात आली होती. जन जागृती मंचाच्या या मागणीला यश आले असून
धोकादायक लाईट डीपी व दोन मोठे पोल
दूर करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
देहुतील अनेक नागरिकांची मागणी होती की, तीर्थशेत्र देहू आळंदी मुख्य कमानी समोरील जयश्री हॉटेल जवळ असणारे वाहतुकीस अडथळा असणारी लाईट डीपी पोल काढून टाकावा. या मागणीसाठी मंचाने कार्यकारी अभियंता भोसरी, सहाय्यक अभियंता निगडी, उपअभियंता देहू महावितरण कंपनी यांच्याशी पत्रव्यवहार व पाठपूरावा करून अपघातास कारणीभूत ठरणारे दोन पोल काढण्यात आले.
या कामासाठी मंचाने अनेक दिवसापासून लेखी पत्रव्यवहार व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून प्रश्न मार्गी लावला. यासाठी मंचाचे अध्यक्ष प्रकाश काळोखे , सचिव दिलीप महाराज मोरे व मंचाचे सर्व अधिकारी व सभासद यांनी विशेष प्रयत्न करुन मार्गी लावला. या बद्दल गावातील व्यक्तींनी समाधान व्यक्त केले.










Leave a Reply