गुड न्यूज! पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ

गुड न्यूज! पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ

बारा तासात 72 मिमी पाऊस, चार टक्यांनी साठ्यात वाढ

Pckhabar- पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सोमवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. आज सकाळी सहा ते सायंकाळी सहा या 12 तासात धरण क्षेत्रात 72 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात दिवसभरात चार टक्क्यांनी वाढ झाली असून साठा 36.65 टक्के झाला आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पिंपरी-चिंचवडकर मागील नऊ महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात आहेत. जून, जुलै महिन्यात पावसाने ओढ दिली. त्यामुळे पाणी कपातीचे संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त केली जात होती. पण, दोन महिन्यांपासून ओढ दिलेल्या पावसाने कालपासून जोरदार हजेरी लावली आहे. रात्रीपासून धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे.

पवना धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी यांनी याबाबतची माहिती दिली. धरण क्षेत्रात सोमवारी रात्रीपासून पाऊस पडत आहे. आज मंगळवारी दिवसभर देखील पाऊस झाला. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा चांगलाच जोर होता. आज सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत या 12 तासात धरण क्षेत्रात 72 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे पाणी साठ्यात चार टक्क्यांनी वाढ झाली असून साठा 36.65 टक्के झाला आहे. आजपर्यंत 633 मिली मीटर पाऊस पडला आहे. सकाळी धरणात 32.43 टक्के पाणीसाठा होता. आता 36.65 टक्के झाला आहे. दिवसभरात 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे तांबोळी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *