Dehu News : आपत्तीचा सामना करण्यासाठी एकोपा महत्त्वाचा : डॉ.किशोर यादव

ओम साई सोसायटीच्या नामफलकाचे उद्घाटन
Pckhabar- आपत्तीमध्ये आपल्या सर्वांचा एकोपा समस्या सोडवण्यासाठी आजच्या काळात महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या संकट काळात सर्वांनी नियमांचं पालन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्रतज्ज्ञ डॉ.किशोर यादव यांनी केले.
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आज (सोमवार) श्रीक्षेत्र देहूतील ओम साई सोसायटीच्या नाम फलकाचा उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्रतज्ज्ञ डॉ. यादव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ओम साई सोसायटीतील सर्व सदस्य उपस्थित होते. डॉ. किशोर यादव यांनी कोरोनाच्या संकटकाळात केलेल्या अनमोल सेवा कार्याबद्दल सोसायटीच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरविण्यात आले.
याप्रसंगी डॉ. किशोर यादव म्हणाले ”आपल्या सर्वांचा एकोपा या विविध समस्या सोडवण्यासाठी आजच्या काळात महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या संकट काळात आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी नियमांचं पालन करणे व विशेषता सध्या डेंग्यूचीही साथ आहे. अशा प्रसंगी सोसायटीतील सर्व सदस्यांनी ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे, त्या ठिकाणी लक्ष देऊन डेंग्यूची समस्या निवारण करण्यासाठी काळजी घ्यावी हे विशेषत्वाने सांगितले”.
या कार्यक्रमाप्रसंगी देहूचे माजी उपसरपंच सचिन साळुंके, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे व्हा. चेअरमन नारायण पचपिंड प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विकास कंद यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन नरेंद्र सहाय, नवल कांबळे, वैभव कांबळे, सचिन जुंदरे, वैभव डोके व संतोष हगवणे यांनी केले.










Leave a Reply