Moshi News : …तर महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकू

Moshi News : …तर महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकू
Pckhabar-चिखली-प्रभाग क्र.2 जाधववाडी, राजेशिवाजी नगर, मोशी परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होतो आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम कर्मचारी, व्यापारी, वर्कशॉप याचे नुकसान होत आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा नगरसेविका अश्विनी जाधव यांनी दिला आहे.

नगरसेविका अश्विनी जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी 7 मे रोजी मोशी चिखली महावितरण कार्यालय अधिकारी रमेश सुळ यांना निवेदन देऊन वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.

जाधव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतनगर कॉलनी क्र. 1 मध्ये रविवार रात्रीपासून वीज नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.  महावितरण अधिकार्‍यांना या समस्येची कल्पना दिली. परंतू वायर उपलब्ध होत नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे दिल्यांनतर नगरसेविका अश्विनी जाधव, जनसेवक संतोष जाधव यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरुन जर या कॉलनीमधील नागरिकांची समस्या सोडविली नाही तर महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा दिला. वरिष्ठांशी बोलल्यावर वायर उपलब्ध करून देत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *