Pimpri News : रोटरी क्लब निगडीतर्फे अन्नधान्य कीटचे वाटप

Pimpri News : रोटरी क्लब निगडीतर्फे अन्नधान्य कीटचे वाटप
Pckhabar-रोटरी क्लब ऑफ निगडी, रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी आणि दिव्यांग विकास संस्था तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगावातील 103 दिव्यांगांना रेशनिंग किटचे वाटप करण्यात आले.

तसेच शरद नगर चिखली येथे ऑर्केस्ट्रा कलाकारांना ३० फुड कीटचे वाटप करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ निगडी चे अध्यक्ष प्रवीण घाणेगावकर माजी अध्यक्ष विजय काळभोर, सेवा संचालक रोटरी मुकुंद मुळे, रवी राजपुरकर, अंकुश पारेख, रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी अध्यक्ष वर्धमान गांधी यांच्या हस्ते रेशनिंग किटचे वाटप करण्यात आले.
तसेच दिव्यांग विकास संस्था तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष किशोर दिघे, किरण करपे, किशोर कुलकर्णी, आर डी अकादमीचे संचालक दत्ता गुरव, हनुमान मंदिर ट्रस्टचे संतोष ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *