Maval News : कात्रज बायपास मार्गे वडगाव मावळ Pmpml बस सेवा सुरू

Maval News : कात्रज बायपास मार्गे वडगाव मावळ Pmpml बस सेवा सुरू

असा असेल बसचा मार्ग
Pckhabar- पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (पीएमपीएमएल) मावळ तालुक्यातील विद्यार्थी, कामगार व प्रवासी नागरिकांकरिता कात्रज ते वडगाव मावळ या नवीन मार्गावरील बससेवेचा रविवारी शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, पीएमपीएमएल निगडी डेपो आगार व्यवस्थापक शांताराम वाघेरे, बालेवाडी आगार व्यवस्थापक माळी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, वडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष मयूर ढोरे, संघटनमंत्री नारायण ठाकर, नगरसेवक सुनिल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, पंढरीनाथ ढोरे, युवक अध्यक्ष कैलास गायकवाड, दत्तात्रय पडवळ व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

तालुक्यातील नागरिकांची होणारी गैरसोय पाहता पीएमपीएमएलकडे अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत होतो. प्रवाशांच्या सोयीसाठी कात्रज-वडगाव मावळ मार्गावर बससेवा सुरु करण्याचा धोरणात्मक निर्णय पीएमपीएमएलने घेतला आहे. या नवीन बसमार्गामुळे सार्वजनिक वाहतूक सक्षम होण्यास मदत होईल व याचा फायदा नक्कीच नागरिकांना होईल, असे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.

असा असेल बसचा मार्ग

कात्रज डेपोतून बायपास मार्गे

चांदणी चौक- भुमकर चौक- सोमाटणे फाटा- तळेगाव दाभाडे स्टेशन- वडगांव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *