Maval News : वर्षा विहारासाठी पर्यटन स्थळांवर प्रचंड गर्दी; कोरोनाचा प्रसार होण्याची भिती
पर्यटकांमुळे ठिक-ठिकाणी वाहतूक कोंडी
Pckhabar- वर्षाविहार करण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबईच्या पर्यटकांनी मावळ तालुक्यात प्रचंड गर्दी केल्याने आज (रविवार) पुणे-मुंबई महामार्गावर ठिक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. या पर्यटकांमुळे सर्व पर्यटक स्थळे गर्दीने फुलून गेले होते. तर हॉटेल, उपहारगृहे, चहा, वडापाव, टपऱ्यावर मोठी गर्दी झाली होती. मात्र, या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
रविवार सुट्टीमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई येथील हौशी पर्यटक मावळात मोठ्या संख्येने दाखल झाले होते. पुणे, पिंपरी-चिंचवड, देहूरोड, तळेगाव या परिसरातील पर्यटक पुण्यावरून मावळाकडे येत असल्याने पुणे-मुंबई महामार्गावर प्रचंड दुचाकी- चारचाकी वाहनांची गर्दी झालेली होती. तर लोणावळा-खंडाळा परिसरात मुंबई बाजूकडील पर्यटक मोठ्या संख्येने आले होते.
कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसून पर्यटक मुक्तपणे सर्वत्र हिंडत होते. पर्यटकांच्या वाहनामुळे सोमाटने टोलनाका, कामशेतब्रिज, कार्लाफाटा या ठिकाणी वाहतुक कोंडी झाली होती. याचा पोलिसावर मोठा ताण पडला होता.










Leave a Reply