पर्यटन बंदी झुगारून विनापरवाना लोणावळ्यात आलेल्या सात जणांवर गुन्हा दाखल
Pckhabar- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाला बंदी असतानाही लोणावळा शहरात येऊन येथील एक बंगला भाड्याने घेऊन राहणाऱ्या सात पर्यटकांसह, हा बंगला बेकायदेशीररित्या भाड्याने देणाऱ्या बंगला धारकाच्या विरोधात लोणावळा शहर पोलिसांनी सोमवारी रात्री कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून दोन रिक्षात हे सात पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले होते. त्यानंतर पोलिसांची नजर चुकवत त्यांनी सेक्टर ‘डी’, गोल्ड व्हॅली येथील माउंट कॉटेज हा बंगला भाड्याने घेतला. रात्रगस्तीवर असलेल्या लोणावळा शहर पोलिसांच्या पथकाला पेट्रोलिंग दरम्यान या बंगल्यासमोर मुंबई पासिंग असलेल्या दोन रिक्षा उभ्या दिसल्या. शंका आल्याने पोलिसांनी चौकशी केली असता बंगल्यात थांबलेले सात जण विनापरवाना आणि बेकायदेशीररित्या येथे राहिलेले आढळून आले.
कोरोनामुळे पर्यटनाला बंदी असताना ही, हे सात पर्यटक विनापरवाना शहरात आल्याचं निष्पन्न झाल्याने तसेच पर्यटन बंदी असताना बंगला भाड्याने दिल्याने बंगलाधारक निदा हनिफ अत्तारी (वय २४, रा. गोल्ड वॅली, लोणावळा) याच्यासह एकूण आठ जणांच्या विरोधात लोणावळा पोलिसांनी भा.द.वि.क १८८, २६९ सह साथीरोग नियंत्रण कायदा १८९७ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पो.कॉ. पवन तायडे यांनी फिर्याद दिली असून लोणावळा पोलीस पुढील तपास करीत आहे.










Leave a Reply