Pimpri Crime News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची रेल्वे खाली आत्महत्या

Pimpri Crime News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची रेल्वे खाली आत्महत्या
Pckhabar- सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने देहूरोड स्टेशन येथे रेल्वे खाली जीव देऊन आत्महत्या केली. ही घटना 23 एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती विजय सुदाम सोनवणे, सासू कांताबाई सुदाम सोनवणे, नणंद माया विशाल कांबळे, दिर संजय सुदाम सोनवणे, सचिन सुदाम सोनवणे (सर्व रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलीला वारंवार विविध कारणावरून शारीरिक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने देहूरोड रेल्वे स्टेशन येथे रेल्वे खाली जीव देऊन आत्महत्या केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *