Pimpri Corona News : मृत्यूचा आलेख मंदावला, 220 नवे रूग्ण, 235 जणांना डिस्चार्ज

Pimpri Corona News : मृत्यूचा आलेख मंदावला, 220 नवे रूग्ण, 235 जणांना डिस्चार्ज

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. रूग्ण संख्या सव्वा दोनशेच्या तर मृत्यूचा आकडही कमी झाला आहे. त्यामुळे शहरवासियांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. तर शनिवारी 220 नवे रूग्ण आढळून आले असून एकाच दिवशी 235 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 55 हजार 130 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 49 हजार 705 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरात महापालिका हद्दीत 4 तर हद्दीबाहेरील 1 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका रूग्णालयात 927 रूग्ण उपचार घेत असून 249 रूग्ण गृह विलगीकरणात आहेत. 1 हजार 176 सक्रीय रूग्ण आहेत.

3 हजार 841  संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 707 घरांना भेटी देऊन 1 हजार 996 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 32 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 414 करण्यात आले आहेत. शहरात 5 लाख 43 हजार 205 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *