पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या घटली; 626 नवे रुग्ण, 16 जणांचा मृत्यू

 
 पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या घटली; 626 नवे रुग्ण, 16 जणांचा मृत्यू
 
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी कोरोनाचे   फक्त 626  नवे रूग्ण आढळले. शहरात कोरोना रूग्ण संख्येने 24 हजारी ओलांडली आहे.  तर 16  जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 900 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
 
शहरात 24 हजार 311 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 5 हजार 984 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात मंगळवारअखेर 17 हजार 106 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत 505 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मनपा हद्दीतील 408 तर 97 मनपा हद्दीबाहेरील आहेत.
मंगळवारी 929  संशयित रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. 300 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 1 हजार 520 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.  
आकुर्डी, चिंचवड, निगडी, कासारवाडी, पिंपळे गुरव, किवळ आदी भागातील 16 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. 23 हजार 481 घरांना भेटी देऊन 77 हजार 245 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *