Talegaon Dabhade Crime News : किराणा दुकानातून चोरट्याने चोरले तेलाचे बॉक्स
Pckhabar-खाद्य तेलाच्या किंमती दुप्पट वाढल्याने चोरट्यांनी आता किराणा दुकान टार्गेट करण्यास सुरूवात केली आहे. दिवसाढवळया चोरट्याने दुकानातून दोन तेलाचे डब्बे, तीन तेलाचे बॉक्स असा 10 हजार 900 रूपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी कॉलेज शेजारील श्री स्वामी समर्थ प्रोव्हीजन स्टोअर येथे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता घडला.
याप्रकरणी संजय अमरचंद्र मुनोत (वय-56, रा. समाजसेवक कॉलनी, तळेगाव चाकण रोड, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी कॉलेज शेजारील श्री स्वामी समर्थ प्रोव्हीजन स्टोअर नावाचे दुकान आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता एक अनोळखी चोरटा दुकानात आला. त्याने दुकानातील 4 हजार 600 रूपयांचे 15 लिटरचे जेमिनी तेलाचे दोन डब्बे, 6 हजार 300 रूपयांचे तेलाचे तीन बॉक्स असा 10 हजार 900 रूपयांचा ऐवज चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.







Leave a Reply