पैशाच्या वादातून कॉफी शॉपची तोडफोड, दोघांना मारहाण

पैशाच्या वादातून कॉफी शॉपची तोडफोड, दोघांना मारहाण
Pckhabar- ऑर्डरच्या पैशांवरून झालेल्या किरकोळ वादातून चार जणांनी कॉफी शॉपमध्ये तोडफोड केली. तसेच दोघांना मारहाण केली. पूर्णानगर – चिंचवड येथे रविवारी (दि. 2) हा प्रकार घडला.
आदित्य अनिल ईघे (वय 18, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकाश म्हस्के (रा. घरकुल, चिखली), गुंल्या व त्यांचे दोन साथीदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आदित्य यांच्या हॉटेलमध्ये आरोपीने दिलेल्या ऑर्डरच्या पैशाच्या कारणावरून किरकोळ वाद झाला. त्या कारणाने आरोपी यांनी आदित्यला  शिवीगाळ करून कॉफीशॉपमध्ये दगड मारून दरवाजाची काच फोडली. तसेच फर्निचर, काचेचे काऊंटर, लॅपटॉप आदी साहित्य लोखंडी पाईपने फोडून नुकसान केले. आदित्य आणि त्याचा कामगार अरमान वायाळ यांना मारहाण केली. चिखली पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *