Pimpri News : YCM रुग्णालयात कोविड रुग्ण पुनर्वसन केंद्र सुरू

Pimpri News : YCM रुग्णालयात कोविड रुग्ण पुनर्वसन केंद्र सुरू

Pckhabar- मागील १ वर्षापासून कोविड आजार साथ सुरू आहे. अनेक कोविड रुग्ण, कोविड बरा झाल्यानंतरही अशक्तपणा, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन दम लागणे यामुळे त्रस्त आहेत. त्यांचे पुनर्वसन करून त्यांची शारिरीक क्षमता तसेच दैनंदिन जीवनशैली सुधारणे अत्यंत आवश्यक आहे. त्याअनुषंगाने पदव्व्युत्तर संस्था- यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय, पिंपरी येथे कोविडनंतरचे पुनर्वसन केंद्र (पोस्टकोविड रिहॅबिलिटेशन सेंटर) सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी सदर केंद्र रूग्णांसाठी कार्यान्वित करण्यात आले आहे. केंद्रामध्ये यासाठी अद्ययावत उपकरणे उपलब्ध केली आहेत.

कोविड बरे झालेले पण कार्यक्षमता कमी झालेल्या रूग्णांना येथे भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट) उपकरणांच्या सहाय्याने योग्य व्यायाम शिकवतील , व वेळोवेळी रूग्ण सुधारणेबाबत दखल घेतील.

या पुनर्वसन केंद्रामध्ये आवश्यक उपकरणे उपलब्ध करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व सिप्ला फाऊंडेशनने पुढाकार घेतला. तसेच महापालिकेने तज्ञ फिजिओथेरपिस्टची नेमणूक केली. केंद्र सुरू करण्याकामी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी अधिष्ठाता डाॅ. वाबळे, सिप्ला फाऊंडेशनचे प्रमुख श्री अनुराग मिश्रा, डाॅ. क्रांती रायमाने, उरोरोग विभागप्रमुख , भौतिकोपचार विभागप्रमुख यांनी वेळोवेळी बैठका घेऊन आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *