Pimpri Corona News : 199 नवे रूग्ण, 224 जणांना डिस्चार्ज

Pimpri Corona News : 199 नवे रूग्ण, 224 जणांना डिस्चार्ज
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या दोनशेच्या आत आली आहे.  तर मृत्यूचा आकडही कमी झाला आहे. त्यामुळे शहरवासियांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे.  तर मंगळवारी 199 नवे रूग्ण आढळून आले असून एकाच दिवशी 224 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 54 हजार 289 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 48 हजार 539 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरात महापालिका हद्दीत 4 तर हद्दीबाहेरील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका रूग्णालयात 1 हजार 325  रूग्ण उपचार घेत असून 195 रूग्ण गृह विलगीकरणात आहेत.

3 हजार 235 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 748 घरांना भेटी देऊन 2 हजार 742 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 82 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 630 करण्यात आले आहेत. शहरात 5 लाख 31  हजार 548 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *