Pimpri News: जागतिक रक्तदाता दिनानिमित्त दिपक भोजने यांचा गौरव
वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेश वाबळे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व गौरव चिन्ह देऊन भोजने यांचा सत्कार
Pckhabar- जागतिक रक्तदाता दिनानिमित्त महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढीच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात रक्त संकलनाचे कार्य करणाऱ्या कै.नंदा ज्ञानदेव भोजने प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक भोजने यांचा सन्मान करण्यात आला. वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेश वाबळे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व गौरव चिन्ह देऊन भोजने यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला पॅथॉलॉजी-विभाग प्रमुख डॉ. तुषार पाटील, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शंकर मोसलगी, किशन गायकवाड उपस्थित होते. वायसीएमएच रक्तपेढीच्या वतीने जागतिक रक्तदाता दिना निमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील काही मोजक्या संस्था , प्रतिष्ठान रक्तदाता , रक्तदान शिबिर संयोजक व आयोजकांचा सत्कार करण्यात आला. त्यात म्हाडा मोरवाडी येथील कै.नंदा ज्ञानदेव भोजने प्रतिष्ठानचाही सत्कार करण्यात आला.
दिपक भोजने यांच्या आईचा मृत्यू 2015 साली झाला. आईच्या पहिल्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबीर करण्याचे ठरविले. गेल्या सहा वर्षांपासून म्हाडा मोरवाडी परिसरात भोजने परिवार त्याच्या सहकारी मित्र परिवार तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.







Leave a Reply