Pimpri Corona News : दिलासादायक! कोरोना रुग्ण संख्या दोनशेच्या आत, मृत्यूची संख्या एक आकडी
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर मृत्यूचा आकडही कमी झाला आहे. त्यामुळे शहरवासियांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे.
तर सोमवारी 158 नवे रूग्ण आढळून आले असून एकाच दिवशी 713 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 6 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात आत्तापर्यंत 2 लाख 54 हजार 90 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 48 हजार 315 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात महापालिका हद्दीत 3 तर हद्दीबाहेरील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका रूग्णालयात 1 हजार 352 रूग्ण उपचार घेत असून 197 रूग्ण गृह विलगीकरणात आहेत. 4 हजार 87 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 895 घरांना भेटी देऊन 3 हजार 476 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 85 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 635 करण्यात आले आहेत. शहरात 5 लाख 28 हजार 744 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.










Leave a Reply