पिस्तुलातून गोळी सुटून तरूणाच्या जबड्यात घुसली विनापरवाना पिस्तुल बाळगल्याप्रकरणी गुन्हा

पिस्तुलातून गोळी सुटून तरूणाच्या जबड्यात घुसली
विनापरवाना पिस्तुल बाळगल्याप्रकरणी गुन्हा
 Pckhabar- विनापरवाना पिस्तुल बाळगून ते बेजबाबदारपणे हाताळत असताना गोळी सुटून जबड्यात घुसल्याने तरूण गंभीर जखमी झाला. ही घटना बाणेर-मोहननगर येथे मध्यरात्री दोन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत राजेंद्र मोरे (वय 28, रा. रोहन लहेर, मोहननगर, बाणेर) असे गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर विनापरवाना पिस्तुल बाळगून हयगयीने व बेजबाबादारपणे हाताळल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्यातील फौजदार नामदेव आंगज यांनी याबाबत माहिती दिली. अनिकेत हा मुळचा अमरावतीचा आहे. बाणेर येथे तो एका तरूणीसोबत तो लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत आहे. बाणेर येथेच दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा तो क्लास घेतो. मात्र, कोरोना साथीमुळे त्याचा क्लास बंद आहे. सहा महिन्यांपासून क्लास बंद असल्याने अनिकेत काही दिवसांपासून तणावाखाली होता. पिस्तुलाचा कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररित्या अनिकेतने 15 दिवसांपूर्वी 25 हजार रूपयांमध्ये एक देशी बनावटीचे पिस्तुल विकत घेतले. रविवारी मध्यरात्री दोन वाजता घराबाहेरील रस्त्यावर तो फिरत होता. यावेळी बेजबाबदारपणे पिस्तुल हाताळत असताना चुकून गोळी सुटून अनिकेतच्या गालात घुसली. यात अनिकेत गंभीर जखमी झाला. त्याच्यावर बाणेर येथील खासगी रूगणालयात उपचार सुरू आहेत. जबड्यात गोळी अडकल्याने त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. सहायक निरीक्षक काटे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *