Bhosari News: वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत, चार महिन्यांचा किराणा

Bhosari News: वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत, चार महिन्यांचा किराणा

शिक्षकमित्र, जिव्हाळा परिवार, स्वाधार संस्थेचा स्तुत्य उपक्रम
Pckhabar-कोरोनामुळे कुटुंबप्रमुखाचे छत्र हरपलेल्या भोसरीतील धावडे वस्ती येथे वास्तव्यास असलेल्या राठोड कुटुंबाला  शिक्षकमित्र, जिव्हाळा परिवार भोसरी, स्वाधार संस्था जयसिंग शिंदे यांच्या माध्यमातून आर्थिक मदत आणि चार महिन्याचा किराणा देण्यात आला.

भोसरी  परीसरातील साई आनंद नगर, धावडे वस्ती,  या ठिकाणच्या कुटुंबाचे प्रमुख  स्व. एकनाथ राठोड यांचे एप्रिल महिन्यात कोरोनामूळे निधन झाले. त्यांना तेजस्वीनी व ऋतूजा या दोन मूली व गणराज एक मूलगा आहे. तेजस्वीनी इंजिनीयरच्या शेवटच्या वर्षात डी. वाय. पाटील आकुर्डी येथे शिकत आहे. ऋतूजा भैरवनाथ विद्यालय भोसरी या शाळेत बारावीत शिकत आहे तर गणराज हा महात्मा फूले विद्यालय भोसरी शाळेत आठवीत शिकत आहे.

वडिलांचे आकस्मिक निधन झाल्याने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.  शिक्षकमित्र व जिव्हाळा परीवार भोसरी, स्वाधार संस्था जयसिंग शिंदे  यांच्या माध्यमातून राठोड कुटुंबाला मदत करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार तेजस्वीनीकडे इंजिनियरींगची शेवटच्या वर्षाची फी तेरा हजार रूपयाचा धनादेश तसेच साधारण चार महिने पूरेल इतके किराणा साहित्य सुपूर्द करण्यात  आली आहे. तसेच  तेजस्वीनीला  नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे  व भविष्यात  तिच्या भावडांच्या शिक्षणासाठी मदत आश्वासन देण्यात आले.

याबरोबरच स्नेहछाया प्रकल्पालाही सूनिता भोसले व सूमित भोसले यांच्याकडून आर्थिक  मदत करण्यात आली.

हा छोटेखानी कार्यक्रम एस. बी. इंग्लिश मिडियम स्कूल दिघी, पूणे 15 या ठिकाणी पार पडला.

याप्रसंगी एस. बी. इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक राज पाटील,  स्वाधार संस्थेच्या प्रतिनिधी स्वाती काणेकर, प्रा.दिगंबर ढोकले, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष हरीष चौधरी, जान डिअर कंपनीचे प्रतिनीधी मनोज गिरे,  स्नेहछाया प्रकल्पाचे संस्थापक दत्तात्रय इंगळे, हुतात्मा राजगुरू फाउंडेशनचे संदीप जाधव, दिलीप होले, काकडे साहेब, सूनिता भोसल, शिंदे सिमा, मुख्याध्यापिका मनिषा निकम, मुख्याध्यापक बाजीराव राक्षे, आगे हनूमंत,  महाजन बी.टी., कुबडे धनंजय, साबळे मॅडम, तानाजी लोहोकरे, सतीश पडवळ, बर्वे अरुण, काळूराम पवार, महेश नेहेरे, गोरक्षनाथ दंडवते, शशिकांत ताटे, सामाजिक कार्यकर्ते संतोष बसगुडे, सचिन कापसे उपस्थित होते.

प्रा. दिगंबर ढोकले, राज पाटिल,  संदीप जाधव, दत्तात्रय इंगळे, हरीष चौधरी, स्वाती काणेकर यांनी मनोगत व्यक्त केली जिव्हाळा परीवाराचे कार्यवाहक जगदाळे सर यांनी प्रास्ताविक व आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *