Pimpri Corona News : मृत्यूचा आलेख घटला, रूग्ण संख्या अडीचशे आत

Pimpri Corona News : मृत्यूचा आलेख घटला, रूग्ण संख्या अडीचशे आत
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या तिनशेच्या आत आली आहे.  तर मृत्यूचा आकडही कमी झाला आहे. त्यामुळे शहरवासियांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे.  तर शनिवारी 240 नवे रूग्ण आढळून आले असून एकाच दिवशी 442 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 53 हजार 713 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 47 हजार 176 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरात महापालिका हद्दीत 7 तर हद्दीबाहेरील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका रूग्णालयात 1 हजार 755  रूग्ण उपचार घेत असून 565 रूग्ण गृह विलगीकरणात आहेत.

4 हजार 606 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 913  घरांना भेटी देऊन 3 हजार 328 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 91 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 650 करण्यात आले आहेत. शहरात 5 लाख 26  हजार 563 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *